जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज झालाय.  ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल. सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील.

जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज झालाय.  ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्याचं कळतंय. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल. सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील. या प्रकल्पावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live