भारत कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याजवळ, महाराष्ट्रात भयावह परिस्थिती

साम टीव्ही
बुधवार, 1 एप्रिल 2020

राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 321 वर पोहचला आहे. यात एकट्या मुंबईत 16 तर पुण्यात 2 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण बुलडाण्यात आढळाय. या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज भर पडतेच आहे. आज सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 19 रुग्णांची भर पडलीय. आणि राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 321 वर पोहचला आहे. यात एकट्या मुंबईत 16 तर पुण्यात 2 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण बुलडाण्यात आढळाय. या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय. काल रात्री एका 75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील मृतांचा आकडा आता 12 वर गेलाय. 
या वृद्ध कोरोनाग्रस्त रुग्णावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय. 

 

राज्यात ३० मार्चपर्यंत राज्याच्या आरोग्य खात्यात कोरोनाबाधित २१६ रुग्णांची नोंद झाली. त्याचे वयनिहाय विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यातून हा निष्कर्ष निघाला. 
राज्यात ९ मार्च रोजी पुण्यात पहिले दोन कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर अपवादात्मक एखादा दिवस वगळता प्रत्येक दिवशी रुग्णांची नोंद आरोग्य खात्यात होत गेली. तीन आठवड्यांमध्ये ही संख्या २१६ पर्यंत वाढली. 

त्यात पहिल्या आठवड्याच्या तुलनेत तिसऱ्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली. ही संख्या नेमकी कशी वाढली, याचे विश्‍लेषण आरोग्य खात्याने केले. त्यात ८० पेक्षा जास्त वयाचे फक्त दोन रुग्ण आढळले. तसेच नऊ वर्षांपर्यंतच्या फक्त सहा जणांना कोरोना झाला आहे. 

वय वर्षे दहानंतर प्रत्येक टप्प्यावर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत गेल्याचे या विश्‍लेषणातून स्पष्ट होते. त्यानंतर ती संख्या परत कमी होत असल्याचे दिसून येते. 

Web Title - marathi news india is near to third step of corona. maharashtra's condition is critical 


संबंधित बातम्या

Saam TV Live