भारत पाकिस्तान मॅचवर २ हजार कोटीचा सट्टा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

भारत-पाकिस्तान हाय होल्टेज मॅचकडे अवघ्या खेळ विश्वाचं लक्ष लागलंय. मॅचची जेवढी उत्कंठा क्रिकेट रसिकांमध्ये आहे तेवढीच सट्टा बाजारात. सट्टा बाजारात भारत-पाकिस्तान मॅचवर तब्बल 2 हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती आहे.

अर्थात सट्टा बाजाराची पहिली पसंती विराट सेनेलाच आहे. पाकिस्तानचा भाव एक ला २० रुपये असा आहे. म्हणजेच पाकिस्तावर १०० रुपये लावल्यानंकर 2000 रुपये मिळतील, या तुलनेत भारताचा भाव  १ ला ३ रुपये असा आहे म्हणजे भारतावर लावलेल्या 100 रुपयांवर फक्त 300 रुपये मिळणार आहे. याशिवाय विकेट, चौकार, सिक्सर तसंच पावसावरही सट्टा लावण्यात आलाय.

मँचेस्टरमध्ये रंगणारा भारत-पाकिस्तान सामना हा वर्ल्ड कप स्पर्धेतला सगळ्यात हाय होल्टेज मुकाबला आहे, या सामन्यावर पावसाचंही सावट आहे. या मॅचवर क्रिकेट रसिकांप्रमाणेच सट्टाबाजाराचं बारिक लक्ष असणार हे नक्की.

Webtitle : marathi news india pakistan match 2000 cr satta 

संबंधित बातम्या

Saam TV Live