स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04 कोटी स्मार्टफोन दाखल झाले आहेत. चीन पहिल्या स्थानावर आहे. 

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04 कोटी स्मार्टफोन दाखल झाले आहेत. चीन पहिल्या स्थानावर आहे. 

भारतात "डाटा' क्रांती झाल्याने स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. स्मार्टफोन निर्मितीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला यापूर्वीच मागे टाकले आहे. "कॅनालिस' या संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनच्या बाजारपेठेत साडेदहा कोटी, तर अमेरिकन बाजारपेठेत 4 कोटी स्मार्टफोन विक्रीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठांमध्ये मंदी असतानाही स्मार्टफोनची विक्री मात्र झपाट्याने होत आहे.

तथापि, चिनी उत्पादकांमुळे युरोपातील बाजारपेठांत खरेदी मंदावली आहे. एकूण विक्री पाहता चीनलाही याचा फटका बसला. स्मार्टफोनची विक्री ज्या देशांमध्ये वाढली त्यामध्ये इंडोनेशिया, रशिया,जर्मनी या देशांचा समावेश आहे. स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंगची आघाडी कायम आहे. त्यापाठोपाठ हुआवेई, ऍपल, शाओमी आणि ओप्पो या कंपन्यांनी बाजारात आपले स्थान कायम राखले आहे. 

WebTitle : marathi news india rank second in buying a smartphone list 


संबंधित बातम्या

Saam TV Live