भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 81व्या स्थानावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 81व्या स्थानावर आला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या ‘जागतिक भ्रष्टाचार अनुभूती निर्देशांक 2017’ मध्ये भारत 81वा आहे. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश आहे. याआधी 2016 साली 176 देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान 79वे होते. या निर्देशांकासाठी 0 गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट देश, तर 100 गुण म्हणजे सर्वाधिक स्वच्छ देश, अशी पट्टी वापरण्यात आली. ताज्या मानांकनात भारताचे गुण 40 इतके स्थिर राहिले. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे.

जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 81व्या स्थानावर आला आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या ‘जागतिक भ्रष्टाचार अनुभूती निर्देशांक 2017’ मध्ये भारत 81वा आहे. या निर्देशांकात जगातील 180 देशांचा समावेश आहे. याआधी 2016 साली 176 देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान 79वे होते. या निर्देशांकासाठी 0 गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट देश, तर 100 गुण म्हणजे सर्वाधिक स्वच्छ देश, अशी पट्टी वापरण्यात आली. ताज्या मानांकनात भारताचे गुण 40 इतके स्थिर राहिले. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे. तसंच आशिया-प्रशांत विभागातील काही देशांत पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते यांना धमक्या दिल्या जातात.


संबंधित बातम्या

Saam TV Live