भारतीय अण्वस्त्र धोरणाच्या टार्गेटवर आता चीन, चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत सज्ज

साम टीव्ही
शनिवार, 15 ऑगस्ट 2020
  • भारतीय अण्वस्त्र धोरणाच्या टार्गेटवर आता चीन
  • पाकिस्तानसोबत भारताच्या टार्गेटवर चिनी ड्रॅगनही
  • चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारत सज्ज

आता बातमी भारताच्या अण्वस्त्र धोरणाची. पाकिस्तान कायमच भारताच्या टार्गेटवर राहिलेलं असताना आता भारत चीनला लक्ष्य करणारेय. कारण भारताच्या अण्वस्त्र धोरणाचं टार्गेट आता चीन बनलंय.

गेल्या काही वर्षांत भारत आणि चीनच्या संबंधात तणाव आलाय. चीन करत असलेल्या कुरापतींमुळे भारतीय लष्कराने आपला मोर्चा चीनकडे वळवला असतानाच, आता भारतीय अण्वस्त्र धोरणाच्या टार्गेटवरही चीनच असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. भारताच्या टार्गेटवर आधी पाकिस्तान होतंच, पण आता चिनी ड्रॅगनही भारताचं लक्ष्य बनलंय.
 

भारताच्या ट्रार्गेटवर चिनी ड्रॅगन

भारताचे आठ टप्प्यात होत असलेले अण्वस्त्र प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत. त्याचसोबत या प्रकल्पांमध्ये आधुनिकीकरणावर भर दिल्याने भारत आणखी सामर्थ्यवान होणार आहे. सध्या भारताच्या पानबुड्या 3, 500 किलोमीटर रेंजच्या क्षमतेने समुद्रावर पाहारा देतायत. काही काळातत भारतीय पानबुड्या 5000 किलोमीटर रेंजच्या क्षमतेने दक्षिण चिनी समुद्रावर करडी नजर ठेवणार आहेत.

याचाच अर्थ वारंवार आपल्या वाटेत येणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारत आता पूर्ण क्षमतेने उतरणार आहे. आता जर चीनने भारताशी पंगा घेतला तर भारत चीनला चांगलाच धडा शिकवणार, यात शंकाच नाही.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live