लडाखमध्ये भारत उभारणार 134 सॅटेलाईट फोन टर्मिनल, संपर्कव्यवस्थेचं जाळं उभारणार सरकार

साम टीव्ही
शनिवार, 27 जून 2020
  • लडाखमध्ये भारत उभारणार 134 सॅटेलाईट फोन टर्मिनल
  • LACवर संपर्कव्यवस्थेचं जाळं उभारणार सरकार
  • सीमेनजीक 57 गावात लागणार मोबाईल टॉवर्स

लडाख सीमेनजीक चीनी कुरापती पाहता भारतीय सैन्य सज्ज होतंय. फक्त सैन्य नाही तर संपर्काच्या बाबतीतही भारतीय सैन्यानं हालचाली सुरु केल्यात. लडाखमध्ये 134 सॅटेलाईट फोन टर्मिनल लावण्याची तयारी सुरु झालीय

लडाखमध्ये भारतीय सैन्य चीनची प्रत्येक चाल नाकाम करण्यासाठी सज्ज आहे. केवळ दारुगोळा, सैन्य इतक्याच बाबतीत भारत सज्ज होत नाहीये तर लडाखमध्ये संपर्क व्यवस्था बळकट करण्यावर भारतीय लष्कर भर देतंय. 

LACवर संपर्कव्यवस्थेचं जाळं 

  • 134 डिजिटल सॅटेलाईट फोन टर्मिनल लडाखमध्ये उभारण्यात येणार आहेत.
  • LAC नजीकच्या 57 गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत
  • फक्त लडाख नाही तर संपूर्ण जम्मू-काश्मिरमध्ये कनेक्टीव्हिटीवर 336 कोटी 89 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
  • त्यापैकी लडाखमध्ये 57 कोटी 4 लाख रुपये संपर्कव्यवस्थेवर खर्च करण्यात येणार आहे
  • गलवान खोरं, दौलत बेग ओल्डी, हॉट स्प्रिंग आणि चुशूल क्षेत्रांना सॅटेलाईट फोन कनेक्शन मिळणार आहे
  • विषम भौगोलिक परिस्थितीमुळे या सीमावर्तीभागात संपर्क व्यवस्था तुटक आहे. अनेक वर्ष LAC वर संपर्कप्रणाली विकसित करण्याची मागणी भारतीय लष्कराकडून होत होती. आता या कामाला तात्काळ सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संपर्कव्यवस्थेमुळे भारतीय लष्कर या भागात आणखी बळकट होणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live