तिसऱ्या T-20 मॅचमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय, T-20 मालिका 1-1 बरोबरीत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

सिडनी : भारतीय क्रिकेट चाहत्यांनी खचाखच भरलेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या निळ्या भासणार्‍या प्रेक्षागृहाला दिवाळी साजरी करायची संधी भारतीय संघाने दिली. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाने उभारलेल्या 164 धावांचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

भारताने 68 धावांची वेगवान सलामी लाभूनही ऑस्ट्रेलियाला खूप मोठी धावसंख्या गाठता आली नाही. कृणाल पंड्याने चार फलंदाजांना बाद केले. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी 8 षटकारांचा मारा गोलंदाजांवर करत 20 व्या षटकात विजय खेचून आणला. विराट कोहली 61 धावा काढून नाबाद राहत विजय हाती घेऊनच परतला. 

विजयाकरता 165 धावा करायचे आव्हान उभे असताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारतीय संघाला मस्त सुरुवात करून दिली. कुल्टर नायलला 20 धावा आणि पुढच्याच षटकात स्टोयनसला 22 धावा चोपून काढताना चौकार षटकारांची आतिषबाजी करत दोघा सलामीवीरांनी 28 चेंडूतच अर्धशतक फलकावर लावले. 67 धावसंख्येवर शिखर धवन (41 धावा) आणि रोहित शर्मा दोघेही पाठोपाठच्या षटकात बाद झाले.

स्थिरावलेले दोन फलंदाज बाद झाल्यावर विराट कोहली आणि लोकेश राहुलने जम बसवायला थोडा वेळ घेतला. 10 षटकात 73 धावा करायच्या बाकी होत्या. बाकी गोलंदाजांना मार पडत असताना मॅक्सवेलच्या मार्‍यावर जास्त धावा निघाल्या नाहीत. 12व्या षटकात धावांचे शतक फलकावर लागले. लोकेश राहुलला धावगती वाढवण्यात यश आले नाही आणि मोठे फटका मारायच्या प्रयत्नात तो बाद झाला. पाठोपाठ रिषभ पंत पहिल्या चेंडूवर बाद झाल्याने दडपण वाढले. 

संबंधित बातम्या

Saam TV Live