पाऊस थांबला नाही तर डकवर्थ लुईस नुसार काय असेल गणित ? 

शैलेश नागवेकर
मंगळवार, 9 जुलै 2019

डकवर्थ लुईसचा खेळ फारच किचकट आणि कधी कधी अन्यायकारकही असतो. भल्या भल्यांना त्याचे गणित अजूनही उमगलेले नाही. षटके कमी झाल्यावर तयार करण्यात येणारे आव्हान चक्रावून सोडणारे असते. उपांत्य फेरीचा हा सामना सध्या पावसामुळे थांबलाय खरा पण भारतीय खेळाडूंच्या डोक्यात विचार चक्र सुरु झालीय आणि जेव्हा नेमके काय करावे लागेल या निर्णयाशी येताच युझवेंद्र चहलची दोन षटके आपल्याला महागात तर पडणार नाही ना याची भिती वाटू लागते.

नेमके काय झाले ते पाहा : 

  • 40 व्या षटकपर्यंत न्यूझीलंडने 3.89 च्या सरासरीने 3 बाद 155 धावा केल्या होत्या
  • पावसामुळे खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 4.57 च्या सरासरीने 5 बाद 211 धावा झाल्या होत्या.
  • अखेरच्या पाच षटकांत तब्बल 49 धावा कुटण्यात आल्या यात चहलने दोन षटकांत 26 धावा दिल्या. म्हणजेच अखेरच्या पाट षटकांत न्यूझीलंडने 9.60 च्या सरारीने धावा केल्या.

खेळ थांबतो तेव्हा किती षटके झाली आणि किती शिल्लक आहे तसेच विकेट किती गमावल्या आहेत यावर डकवर्थ लुईसचे गणित तयार होते.  त्यानुसार जर षटके कमी झाली तर भारतासमोर

46 षटकांत 237 धावा
40  षटकांत 223 धावा
35 षटकांत  209 धावा
30 षटकांत 192 धावा
25 षटकांत 172 धावा
20 षटकांत 148 धावा

असे आव्हान असणार आहे तेव्हा चहलली ती दोन षटके महागात पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live