भारत पाक सामना पावसामुळे नाही झाला तर तब्बल किती कोटीचं नुकसान होणार माहितीये?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

मँचेस्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येतायेत. भारत-पाकिस्तान मॅच म्हंटली की साऱ्या जगाचं या मॅचकडे लक्ष असतं. या मॅचची क्रिकेट चाहत्यांना जितकी उत्सुकता आहे तितकीच चिंताही लागून राहिलीय. कारण भारत-पाक लढतीत पाऊस पडल्यास, एक दोन नव्हे तर तब्बल 200 कोटींचं नुकसान होणारंय. 

भारत पाकिस्तान मॅच रद्द झाल्यास सर्वात जास्त फटका बसेल तो स्टार स्पोर्ट्सला. या मॅचच्या माध्यमातून स्टारनं 100 कोटींची कमाई करण्याचा मनसुबा रचलाय. स्टारवर 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 25 लाख रुपये मोजावे लागत आहेत. भारताच्या इतर सामन्यात दहा सेकंदाच्या जाहिरातीसाठी 16ते 18 लाख मोजावे लागतात, तर इतर सामन्यांसाठी केवळ 5 लाख मोजले जात आहे

त्यामुळे भारत-पाकिस्तान मॅचमध्ये पाऊस पडला. तर स्टारला सरळसरळ या शंभर कोटींवर पाणी सोडावं लागेल. याशिवाय या सामन्यांच्या तिकिटांची किंमत 60 हजारांवर पोहचलीय. ते देखील नुकसान सोसावं लागेल. भारत-पाकिस्तान मॅचवर सट्टेबाजाराही लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मॅचवर पाणी पडल्यास सट्टाबाजारही पाण्यात जाईल. म्हणजेच जवळपास 200 कोटींचं नुकसान होईल...यावरून भारत-पाकिस्तान मॅच सर्वांसाठी किती महत्वाची आहे हे लक्षात येईल. त्यामुळे सारेच जण वरूणराजाची प्रार्थना करतायेत. 
 
WebTitle : marathi news india vs pakistan match update and monsoon update 

संबंधित बातम्या

Saam TV Live