राजकोट कसोटीत भारताचा विंडीजवर एक डाव २७२ धावांनी विजय..

राजकोट कसोटीत भारताचा विंडीजवर एक डाव २७२ धावांनी विजय..

राजकोट : वेस्ट इंडीजच्या दुबळ्या संघाने बलाढ्य भारतीय संघासमोर राजकोट कसोटीत सपशेल शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीत आज (शनिवार) सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने वेस्ट इंडीजचा एक डाव 272 धावांनी पराभव केला.

भारतीय संघाने पहिल्या दोन दिवसांत कसोटीवर वर्चस्व गाजविल्यानंतर आज तिसऱ्या दिवशीही विंडीजचा पहिला डाव गुंडाळून दुसऱ्या डावातही विंडीजच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकू दिले नाही. त्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकाची औपचारिकता सहज पूर्ण केली होती. रवींद्र जडेजाने घरच्या मैदानावर शतक करताना अष्टपैलू चमक दाखवली. रिषभ पंतने कसोटीत वन-डेचा सराव केला होता. भारतीयांचा खेळ पाहून ते 40 अंश तापमानात खेळत आहेत, असे कधीही वाटत नव्हते. विंडीजच्या गोलंदाजीत भेदकता नावापुरतीही नव्हती. त्यांनी त्यातच बचावात्मक क्षेत्ररचना करीत सहज धावा दिल्या. 

विंडीज फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाजच येत नव्हता. शमीने चार षटकांत सलामीवीरांना तंबूत धाडले आणि फिरकीचा धसका विंडीजला जाणवू लागला. शई होप फिरकीही न घेतलेल्या चेंडूवर बाद झाला. त्यातच जडेजाने धावचीतची संधी असताना मिडऑनवरून यष्टींच्या दिशेने हळुवार चालत गेला आणि अगदी जवळून चेंडू यष्टींवर मारला. हे पाहून कोहलीही नाराज झाला. विंडीजचे सहा फलंदाज 29 षटकांत परतले. आता कसोटी चौथ्या दिवसांपर्यंत तरी जाणार का, हा प्रश्‍नच होता.

आज, तिसऱ्या दिवशीच भारताने विजय मिळवून विंडीजला पूर्णपणे निष्प्रभ ठरविले. भारतीय गोलंदाजांनी विंडीजचा पहिला डाव 181 धावांत गुंडाळून त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही विंडीजच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटूंनी आपल्या तालावर नाचविले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत पाच बळी मिळविण्याची कामगिरी केली. तर, आश्विनने तीन आणि जडेजाने दोन बळी मिळविले. विंडीजकडून किरॉन पॉवेलने सर्वाधिक 83 धावा केल्या.

WebTitle : marathi news india vs west indies india won by innings and 272 runs 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com