येत्या दोन वर्षांत भारत होणार टोल फ्री...कसा? तुम्हीच वाचा...

साम टीव्ही
शनिवार, 19 डिसेंबर 2020
  • येत्या दोन वर्षांत भारत होणार टोल फ्री
  • टोल नाक्यांचा अडथळा होणार दूर
  • टोलवसुलीसाठी GPS सिस्टीमचा वापर

खासगी वाहनानं प्रवास करायचा झाल्यास टोलनाक्यांचे अडथळे आता काही नवे नाहीत. पण आता वाहनांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता देशात कुठेही प्रवास करता येणं शक्य होणार आहे. काय आहे नेमकी योजना? पाहूयात...

देशातील वाहनांचा मुक्त संचार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. येत्या दोन वर्षांत संपूर्ण देशभरातल्या टोल नाक्यांचा अडथळा दूर होणार आहे. त्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा वापर करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेतलाय. 

असा आकारला जाणार टोल

टोलवसुलीसाठी रशियन बनावटीच्या GPS प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या वाहनाने किती अंतर कापलं याची अचूक नोंद होऊन त्यानुसार तुमच्या वाहन क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यातूनच टोलची रक्कम परस्पर वजा होणार आहे. सध्या फक्त व्यावसायिक वाहनांसाठी ही ट्रॅकिंग सिस्टम वापरली जात असून लवकरच खासगी वाहनांचंही ट्रॅकिंग केलं जाणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत देशभरातल्या टोलचं एकूण उत्पन्न 1 लाख 34 हजार कोटींवर जाणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे टोल कंत्राटदार आणि सरकारच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येणार आहे. शिवाय कोट्यवधींच्या इंधनाचीही बचत होणार असून कॅशलेस व्यवहारांनाही त्यामुळे प्राधान्य मिळणार आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live