मिग- 27 विमानांचं युग संपलं... आज अखेरचं उड्डाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

भारतीय हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचे लढाऊ विमान MIG-27 आज सेवेतून निवृत्त होईल. मागील चार दशकांपासून अविरत सेवेत असलेले हे लढाऊ विमान आज (ता. 27) शेवटचे उड्डाण करेल. राजस्थानातील जोधपूर येथे मिग-27ची तुकडी शेवटचे उड्डाण करेल.

MIG-27 च्या शेवटच्या तुकडीत सात विमाने असून ही सात विमाने आज प्रात्यक्षिके सादर करतील. यानंतर ही विमाने सेवेतून बाहेर पडतील. त्यानंतर ती कोणत्याही गोष्टीसाठी वापरली जाणार नाहीत, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल सोमबीत घोष यांनी सांगितले. 

MIG-27 विमानांची वैशिष्ट्ये
- MIG-27 विमानाला 'बहादूर' विमान म्हणून ओळखले जाते. कारगिल युद्धातील या विमानाची कामगिरी बघून बहादूर नाव ठेवले गेले.
- 1980 मध्ये रशियाकडून विकत घेण्यात आले होते.
- ऑपरेशन पराक्रमसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कवायतींमध्ये सहभाग घेतला होता.
- कारगिल युद्धात मोठा पराक्रम
- यात कॉकपीट विमानात अत्याधुनिक सुविधा

Web Title: Indian Air Force retires MiG 27 today at Air Force Station Jodhpur

संबंधित बातम्या

Saam TV Live