जवानाच्या लग्नाची चालू होती जय्यत तयारी, पण तो पोहोचू शकला नाही; कारण...

जवानाच्या लग्नाची चालू होती जय्यत तयारी, पण तो पोहोचू शकला नाही; कारण...

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या एका जवानाचे बर्फवृष्टीमुळे लग्न हुकले आहे. बर्फवृष्टीमुळे जवान स्वतःच्या लग्नालाच पोहोचू शकला नाही. गुरुवारी सुनिलचे लग्न होते. परंतु, तो काश्मीरखोऱ्यात सुरक्षेसाठी तैनात होता. मागील दोन दिवसांपासून काश्मीरखोऱ्यात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. बुधवारपासून सुनिलच्या लग्नाची घरात तयारी सुरु असतानाच झालेल्या बर्फवृष्टीमुळे त्याला लग्नासाठी पोहोचता आले नाही.

सुनिलच्या लग्नासाठी सर्व नातेवाईक घरी जमले होते मात्र, तो पोहोचू शकला नाही. त्याच्या सुट्या १ जानेवारीपासूनच सुरु झाल्या होत्या. भारतीय लष्कराच्या चिनॉर कॉर्प्सने याबाबत रविवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात छापून आलेली बातमी ट्विट करताना 'काळजी नको आयुष्य वाट पाहत आहे, मुलीच्या घरचे नवीन तारीख काढून लग्न करून देण्यास तयार असल्याचीही माहिती या ट्विटमधून देण्यात आली आहे.

#LifeWillWaitThatsAPromise #IndianArmy Jawan misses wedding after #Kashmir Valley gets snowed in. Don't worry life will wait. #NationFirstAlways The bride's family agrees to a new date. Just another day in the life of a soldier.@adgpi @NorthernComd_IA @easterncomd pic.twitter.com/G1b1u5bCi6

— Chinar Corps - Indian Army (@ChinarcorpsIA) January 18, 2020

तत्पूर्वी, एक भारतीय जवान हिमाचलमधील मंडी या गावचा राहणारा होता. परंतु काश्मीरखोऱ्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद झाल्याने त्याला परत येणे अशक्य झाले. यासंबंधी पूर्ण माहिती जवान सुनीलने घरच्यांना फोनवरून कळवली. यावेळी वधूच्या काकांनी सांगितले की, आम्ही दुसरी तारीख काढू काही अडचण नाही. तो देशाची सेवा करत आहे. आम्ही त्याच्यासाठी कितीही वेळ थांबू शकतो. आम्हाला सुनीलचा अभिमान आहे.

Web Title  indian army soldier not his own wedding due snowfall

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com