भारताच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण; गाठला साडेसहा वर्षांतील नीचांकी विकासदर

भारताच्या अर्थव्यवस्थेला ग्रहण; गाठला साडेसहा वर्षांतील नीचांकी विकासदर

तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा एखादा लहानसा उद्योग असेल. तुम्हाला आता सावधपणे पावलं टाकावी लागतील. कारण, कधी तुमच्या हातातली नोकरी निघून जाईल किंवा तुमच्या उद्योगाला टाळं लावावं लागेल, याची शाश्वती उरलेली नाही.

भारतीय अर्थव्यवस्थेभोवती मंदीचा फास हळूहळू आवळू लागलाय. देशाचा विकासदर तब्बल 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरलाय. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतला जीडीपीचा आकडा आला आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. हा आकडा गेल्या साडेसहा वर्षांतला नीचांकी आकडा आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम तिमाहीत हाच दर 5.8 टक्के होता.

जीडीपीतली ही घट सामान्यांच्या आयुष्याशी थेट निगडीत आहे. त्याचे काय परिणाम होतात हे पाहा पाहूया.. 

  • 5 टक्क्यांपर्यंत जीडीपी घसरल्यानं आपण चीनच्या मागे घसरू
  • जीडीपीतली सततची घसरण म्हणजे आर्थिक मंदीचे संकेत मानले जातात.
  • उत्पादन क्षेत्रात घट होईल आणि बेरोजगारीत वाढ होईल.
  • लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाल्यानं त्याचा उद्योग-व्यवसायावर परिणाम होईल.
  • जीडीपी 5 टक्क्यांवरून 4 टक्क्यांपर्यंत खाली आल्यास दरमहा उत्पन्न 105 रुपयांनी  घटेल.
  • म्हणजेच वार्षिक 1260 रुपयांचा फटका बसेल..


जीडीपीतली घसरणीचा प्रामुख्यानं गरिबांवर परिणाम होतो. आधीच वाहन उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रात आधीच मोठ्या  प्रमाणावर कामगार कपात सुरू झालीय. मंदीचं हे दुष्टचक्र असंच सुरू राहिलं तर त्याच्या कचाट्यात आपणही येऊ शकतो..त्यापासून वाचणार नाही, अशी भाबडी अपेक्षा बाळगण्यात काहीच अर्थ नाही.

WebTitle : marathi news indian economy touched lowest of last 6 years 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com