स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांची कारवाईला सुरुवात; स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती मिळणार भारत सरकारला

स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांची कारवाईला सुरुवात; स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती मिळणार भारत सरकारला

स्विस बँकेतल्या भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच भारत सरकारला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईला सुरुवात केली आहे. स्विस अधिकाऱ्यांनी एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीय लोकांना यासंबंधी एक लिखित स्वरूपात नोटीसही पाठवली आहे.

ऑगस्ट 2008 मध्ये स्वित्झर्लंडच्या फेडरल कोर्टाच्या निर्णयानंतर स्विसमधल्या खातेधारकांची माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जवळपास दीड महिन्यांपूर्वी स्विस बँकेत खाती असलेल्या भारतीय खातेधारकांना फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून नोटीसही पाठवण्यात आली. 

भारताकडून मागणी करण्यात आलेल्या काळा पैशाची माहिती ही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय करारांतर्गत येते. नोटीसमध्ये एप्रिल 2011 पासून खातेधारकांना माहिती देण्यास सांगण्यात आलं होतं.

website : Indian government will soon get information of Indian account holders in Swiss bank 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com