भारतीय नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर सोमवारी तामिळनाडूच्या राजालीमध्ये दुर्घटनाग्रस्त अवस्थेत कोसळले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.

हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जून महिन्यात गुजरात कच्छमध्ये हवाई दलाचे फायटर विमान कोसळले होते. या अपघातात भारताने आपले कुशल वैमानिक संजय चौहान यांना गमावले होते. नियमित सरावासाठी त्यांच्या विमानाने जामनगर हवाई तळावरुन उड्डण केले होते. या अपघातानंतर तीन दिवसांनी अहमदाबाद येथे हवाई दलाचे विमान कोसळले होते. त्यानंतर आता ही चेतक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे.

WebTitle : marathi news indian navy chetak helicopter crashed in tamilnadu 

संबंधित बातम्या

Saam TV Live