देशातील पोस्ट ऑफिसमधील कामकाज ठप्प 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

देशातील सर्व पोस्ट ऑफिसमधील कामकाज गुरुवारी दुपारी दीड वाजल्यापासून ठप्प झालं आहे. सर्व पोस्ट कार्यालयांना एकमेकांशी जोडणाऱ्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने कामकाज ठप्प झालं आहे. यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय. सर्व्हरची ही समस्या नेमकी कधी दुरुस्त होऊ शकेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील रजिस्ट्रार कार्यालयातील सर्व्हरमध्येही बिघाड झाला होता. त्यावेळी राज्यभरातील सह निबंधक कार्यालयेही तीन दिवस बंद होती... यामुळे अनेकांना मालमत्तांचे व्यवहारही करता आले नव्हते.

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live