नीरव मोदी व मेहुल चोकसी या दोघांचेही पासपोर्ट रद्द

नीरव मोदी व मेहुल चोकसी या दोघांचेही पासपोर्ट रद्द

पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परतावे याकरता सीबीआय, ईडीने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. या दोघांचेही पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे.... त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. नीरव मोदी न्यूयॉर्क येथील जे डब्ल्यु मॅरियटच्या ऍसेस हाऊसमधे असलेल्या 36 व्या मजल्यावरील स्वीटमध्ये आरामात राहत असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीने PNB घोटाळ्याची मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू केली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील 11 हजार 300 कोटींच्या घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी पाच हजार कोटींचा घोटाळा हा एनडीए म्हणजेच नरेंद्र मोदींच्या काळात झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदीला 2017 मध्ये एलओयू दिल्याचं उघड झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com