भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत, वाचा सीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची ही माहिती 

साम टीव्ही
बुधवार, 22 जुलै 2020

 

  • भारतीयांना कोरोना लस मिळणार मोफत 
  • सीरमच्या उप्तादनापैकी 50 टक्के लस भारतीयांना दिली जाणार
  • सीरमचे इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांची माहिती 

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या संशोधनात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतलीय. या लसीच्या उप्तादनात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावतीय. आता कंपनीच्या एकूण उप्तादनापैकी कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणारंय.

कोरोनावर लस कधी येणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. लस संशोधनात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतलीय. मानव जातीसाठी अक्षरशः संजीवनी ठरेल, अशी ही लस अंतिम चाचण्यांनंतर येत्या काही दिवसांत, जगभरात वितरीत होण्याची शक्यता आहे. या लस संशोधनात भारतातील एका बड्या कंपनीचं योगदान असल्यामुळं भारताला या संसोधनाचा खूप मोठा फायदा होणारय. पुण्यातील सीरम इन्सटिट्यूट या लस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतीय. विशेष म्हणजे या कंपनीच्या एकूण लस उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी होणार असल्याची माहिती, सीरम इन्सटिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलंय. 

काय म्हणाले आदर पूनावाला

या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी भारतात करण्याची रितसर अनुमती घेण्याचं काम सुरू आहे. नियोजनाप्रमाणं जर लसीच्या चाचण्या झाल्या तर, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सीरम इन्स्टिट्यूट काही लाख डोस तयार करू शकेल आणि 2021च्या मार्चपर्यंत जवळपास 30 ते 40 कोटी डोस तयार असतील.भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही, सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल. 

लसीच्या उप्तादनासाठी सरकारकडून चांगला पाठिंबा मिळत असल्याचंही आदर पूनावाला यांनी म्हंटलंय. सीरमच्या उप्तादनापैकी 50 टक्के उप्तादन भारतीयांना दिलं जाईल आणि 50 टक्के जगात वितरीत केलं जाणारंय. भारतासह साऱ्या जगाचं लक्ष ऑक्सफर्डच्या यशाकडे लागलंय. आता लसीच्या चाचण्यांना चांगलं यश मिळून कोरोनाबाधितांना ही लस लवकरात लवकर मिळो, हीच अपेक्षा.


संबंधित बातम्या

Saam TV Live