धक्कादायक! भारतात एका दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण वाढले...

साम टीव्ही न्यूज
रविवार, 12 एप्रिल 2020

भारतात कोरोनाच्या शिरकावाने अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली. आता कर एका दिवसात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय.

देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नऊशे नऊ रुग्ण वाढले असून, मृतांच्या आकडेवारीतही वाढ झालीय. गेल्या चोवीस तासांत चौतीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील मृतांची संख्या दोनशे एकोणऐंशी एवढी झालीय. तर आतापर्यंत आठ हजार तीनशे छपन्न जणांना कोरोनाची लागण झालीय. तर सातशे सोळा जणांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलंय. कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्याखालोखाल मध्य प्रदेश , दिल्ली आणि गुजरातचा क्रमांक लागतो.

पाहा सविस्तर व्हिडीओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live