इंडियाज मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर मेला ?

इंडियाज मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर मेला ?

पाकिस्तानच्या रावळपिंडीत सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटानंतर चर्चा सुरू झाली ती इंडियाज मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या मृत्यूची. कारण याच हॉस्पिटलमध्ये मसूद अजहरवर उपचार सुरू होते. या भीषण स्फोटात 16 लोक जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या सेना मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे सैन्याचं हॉस्पिटल आहे. मात्र स्फोटानंतर सेना आणि सरकारनं इथलं वार्तांकन करण्यास बंदी घातलीय. तर दुसरीकडे मसूद अजहरच्या मृत्युच्या बातम्यांनी सोशल मीडियात चर्चेला पूर आलाय. 

कोण आहे मसूद अजहर?

मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्रं उभारली होती. कंदहार विमान अपहरणानंतर 1999 मध्ये भारताला अजहरची सुटका करावी लागली होती. यानंतर अजहरनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ सुरू केले. पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलंय. 

मसूद अजहरच्या मृत्युबाबत संभ्रम असला तरी यातून पाकचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झालाय. मसूद अजहरचं मरण पावला की जखमी झाला? याविषयीचा कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही.  या स्फोटाआडून पाक सरकारनं मसूदला गायब केल्याचंही बोललं जातंय. असं असेल तर भारतासह दहशतवादाविरोधात लढणाऱ्या देशांनी पाकला कायमची अद्दल घडवायला हवी.

WebTitle : marathi news indias most wanted terrorist masood azhar died in blast 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com