भूकंपाने हादरलं इंडोनेशिया  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

इंडोनेशियाला भूकंपाचे जोरदार हादरे बसलेत. या भूकंपामुळे आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी आहेत.  या भूकंपाची तीव्रता सात रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आलीय.

या भयंकर भूकंपात मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येतेय. भूकंपाचा केंद्रबिंदू फक्त दहा किलोमीटर भूभागात असल्याने या भूकंपाची तीव्रता अधिक असल्याचं बोललं जातंय. या भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालंय.

सध्या या भागातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आलाय. या भयंकर भूकंपामुळे इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यताही वर्तविण्यात आलीय.

WebTitle : marathi news Indonesia earthquake 82 killed more than 100 wounded 
        
संबंधित बातम्या

Saam TV Live