लायन एअरवेजच्या विमानाचा अवघ्या १३ मिनिटांत तुटला संपर्क; प्रवाशांचं नेमकं झालं काय?

लायन एअरवेजच्या विमानाचा अवघ्या १३ मिनिटांत तुटला संपर्क; प्रवाशांचं नेमकं झालं काय?

इंडोनेयिची राजनाधी जकार्ताहून  'लायन एअर'च्या 'बोईंग 737 मॅक्स 8' या विमानाने पान्गकल पिनांगसाठी उड्डाण केलं. मात्र  टेक ऑफ केल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलर्ससोबत अवघ्या 13 मिनिटांमध्ये सकाळी ६.३३ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला.  हे विमान समुद्रात कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

जकार्ताहून हे विमान पान्गकल पिनांग इथे जात असताना जावा समुद्रात कोसळलं. लायन एयरलाईन्सचं जेटी 610 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात २०० हून अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. 

इंडोनेशियातील बचावयंत्रणा या विमानाचा शोध घेण्यासाठी निघाल्या असून, या दुर्घटनेमुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान विमानाचं लोकेशन अद्याप निश्चित झालं नसल्याचं लायन एअरवेजच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

WebTitle : marathi news Indonesian lion airways plane crash Boeing 737 max 8 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com