इंदोरीकर महाराजांची ती फाईल बंद होण्याची शक्यता...

इंदोरीकर महाराजांची ती फाईल बंद होण्याची शक्यता...

नगर ः "मुलाच्या जन्मासंदर्भातील वक्तव्य मी केलेले नाही,' असे स्पष्ट करत निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांनी जिल्हा रुग्णालयात काल सादर केलेल्या खुलाशात हात वर केले आहेत. कीर्तनात केलेल्या या कथित वक्तव्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार दाखल केली होती. त्याबाबत इंदोरीकर महाराजांना खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली होती. 

इंदोरीकर महाराजांनी काल वकिलाकरवी बंद लिफाफ्यात दिलेल्या खुलाशाची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार महाराजांनी खुलाशात म्हटले आहे, "मुलाच्या जन्माबाबतचे वक्तव्य मी केलेले नाही. जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांत नगर जिल्ह्यात माझे कीर्तनही झाले नाही. आतापर्यंत मी एकाही कीर्तनाचे व्हिडिओ रेकॉडिंग केलेले नाही. त्या सोशल मिडीयावरील व्हिडिओत छेडछाड केली असावी. त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही.'

"इंदोरीकर महाराज कीर्तनांमधून महिलांबाबत वादगस्त वक्तव्य करतात आणि केलेले आहे,' असे आरोपही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा रुग्णालयात दिलेल्या निवेदनात केले होते. तथापि, इंदोरीकरांनी काल दिलेल्या खुलाशात या आरोपांसंदर्भात काहीही म्हणणे मांडलेले नसल्याचे समजते.

अद्याप क्‍लीन चीट नाही 
दरम्यान, इंदोरीकर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याबाबतचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सकांना मिळाला आहे; मात्र इंदोरीकरांना क्‍लिन चिट देण्याचा प्रश्‍नच येत नाही. संबंधित तक्रार अथवा माध्यमांनी पुरावे दिल्यास त्याची पडताळणी करून पुढील कारवाई करू, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title -  Indorikar Maharaj's case file can be closed forever..?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com