पूल कोसळला मात्र थोडक्यात अनर्थ टळला... काय घडलं वाचा

 Indrayani The bridge collapsed
Indrayani The bridge collapsed

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीला जोडणारा आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पुल आज सकाळी सहाच्या सुमारास कोसळला. नदीपात्रात खोल पाणी असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासत आहेत. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस गेल्यानंतर पूल कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

इंद्रायणी नदीवरील आंबी येथील पुलावरुन तळेगाव एमआयडीसीकडे रोज शेकडो वाहने ये जा करतात. बंदी असूनही डंपर आणि इतर अवजड वाहने सर्रास चालू होती. दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी अवजड वाहनांसाठी लावलेले अडथळे अज्ञात वाहतुकदारांनी जेसीबीने तोडून टाकले. त्यानंतर वारंवार विनंती अर्ज करुनही सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस अवजड वाहतुक रोखू शकले नाहीत. परिणामी आज सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पुलाच्या ऐन मधलया मोरीवरील स्लॅब नदीपात्रात कोसळला. अचानक झालेल्या मोठया आवाजाने भयभीत गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. वाहने आडवी लावून इशारा देत वाहतुक थांबवण्यात आली आहे. माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी पुलाकडे धाव घेत बंदोबस्त लावला.

प्रत्यदर्शीच्या म्हणण्यानुसार, सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नसली तरी. नदीपात्रात खोल असल्याने एखादे छोटे मोठे वाहन पुलासोबत नदीपात्रात कोसळले कि काय? याची शक्यता पोलिस तपासून पाहत आहेत. विशेष म्हणजे ऑगस्ट २०१६ मध्ये कोकणातील सावित्री नदी पुल दुर्घटनेवेळी, आंबी येथील पुलाची तत्कालीन तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करुन पुल वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.स्वातंत्र्योत्तर काळात बांधला गेलेला हा पुल चाळीस वर्षाहून अधिक जुना होता.

Web Title: bridge collapsed on Indrayani river near Lonavala

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com