जामीयाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीने देशभरात निदर्शनं

जामीयाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीने  देशभरात निदर्शनं

 
जामियातून सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण देशभर पसरल्यानंतर, आता जामीयाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या मारहाणीचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येताय. रविवारी जामियाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं.

यानंतर पोलिसांनी विद्यार्य़ांसोबत दडपशाही केल्याचा आरोप विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनानं केला. यावेळी पोलिसांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्याचे व्हिडिओज समोर आलेत. यामध्ये पोलिस अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारतांना दिसतायत.

शिवाय जामियाच्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांसारखं हात वर काढून बाहेर आणल्याचा आरोप विद्यार्थी करतायत. मात्र विद्यार्थी हिंसक झाल्यामुळे लाठिचार्ज करावा लागल्याचं स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलं. 'जामिया'तील घटनेची चौकशी व्हावी, यासाठी केरळपासून पश्चिम बंगालपर्यंत आणि तेलंगणपासून उत्तर प्रदेशापर्यंत हजारो विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर उतरले. विरोधकांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व देशभरातून असंवैधानिक कायद्याला विरोध होत असल्याचे सांगून 'जामिया'तील मारहाणीचा निषेध केला.. दरम्यान आज या मुद्दयावरुन विरोधक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणारयत.

एकीकडे देशातील विद्यापीठांमध्ये नागरिकत्व कायद्याचा मुद्दा पेटलाय. अशातच तणावात असलेलं आसाम आता हळूहळू पूर्वपदावर येतंय. आसाम मध्ये दोन दिवसांपूर्वी मोठा हिंसाचार झाला होता. दरम्यान नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर आसाममध्ये  आजपासून कर्फ्यू मागे घेण्यात आलाय.

 बंद करण्यात आलेली इंटरनेटची ब्रॉडबँड सेवा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आलीय. त्यामुळे इथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. गुवाहाटीमध्ये संचारबंदीला न जुमानता लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. 

Web Title - ​Inhuman beatings on students of Jamia led to protests across the country

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com