BREAKING | कोरेगाव-भीमा प्रकरणी शरद पवार आणि फडणवीसांची साक्ष घेणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणी एकावर एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी मोठी बातमी समोर येतेय. कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. चौकशी आयोग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरेगाव भीमा प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बोलावणार आहे. निवृत्त न्यायाधीश जे एन पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

कोरेगाव भीमा हिंसेच्या चौकशी आयोगाचे जे एन पटेल हे अध्यक्ष आहेत. दरम्यान, जे एन पटेल यांनी शरद पवार यांना चौकशीसाठी बोलावल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. शरद पवार यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणात काही हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे असं म्हंटलं होतं. याबाबत बोलताना शरद पवार यांनी काही नावांचा देखील उल्लेख केलेला होता. यामध्ये एकबोटे यांचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना याबाबत माहिती असल्यास त्यांचा जबाब नोंदवा असं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांना याबाबत माहिती असल्यास त्यांचा जबाब नोंदवला गेला पाहिजे असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील म्हणाले होते.

याचसोबत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील जबाब नोंदवला जाणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना वायरलेसवर काय आदेश दिलेत, संपूर्ण प्रकरण फडणवीसांनी कशा प्रकारे हाताळलं, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.

दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी कुणालाही बोलावलं जाऊ शकतं असं चौकशी आयोगाने या आधीच नमूद केलंय. अशात आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार आहे.

Web Title: inquiry commission of koregaon bhima will call sharad pawar and devendra fadanavis

संबंधित बातम्या

Saam TV Live