सागर परिक्रमा करून नऊ महिन्यांनंतर INS तारिणी परतणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

भारतीय नौदलातील सहा महिला अधिकारी, त्यांची साहसक्षमता सिद्ध करत ‘आयएनएस तारिणी’ या नौकेसह जगभर सागर परिक्रमा करून पुन्हा गोव्यात दाखल होत आहे. सुमारे नऊ महिन्यांच्या सफरीनंतर येत्या 21 मे रोजी गोव्याच्या किनारपट्टीवर त्या पाऊल ठेवतील. या वेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन त्यांचं स्वागत करणार आहेत . ‘महादेई’नंतर जगप्रवास करणारी ‘तारिणी’ ही दुसरी भारतीय नौका आहे. हॉलंडच्या टोंगा 56 नौकेच्या धर्तीवर तिची बांधणी करण्यात आली आहे. त्यावर आधुनिक सॅटेलाइट यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याद्वारे जगभरात कुठेही संपर्क साधण्यात येऊ शकतो.

संबंधित बातम्या

Saam TV Live