वाचा, भारत-चीन वादाची इनसाईड स्टोरी

साम टीव्ही
शनिवार, 20 जून 2020
  • भारताच्या भूभागावर कब्जा करण्याचा चीनचा डाव
  • गलवान खोऱ्यात वारंवार चीन का करतोय घुसखोरी? 
  • भारत-चीन वादाची इनसाईड स्टोरी

भारत आणि चीन यांच्यात सीमावादावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. ज्या गलवान खोऱ्यावरून हा वाद पेटलाय. तिथं चीन वारंवार घुसखोरी का करतोय? चीनला गलवान खोरं नेमकं कशासाठी हवंय? पहा...

भारताच्या नकाशावर दिसणारा हा भूभाग अक्साई चीन या नावानं ओळखला जातो. मात्र लडाखला जोडून असलेलं हे खोरं गलवान खोरं म्हणून ओळखलं जातं आणि याच खोऱ्यावरून सध्या भारत-चीन संघर्ष इरेला पेटलाय. 

आता हा संपूर्ण नकाशा पुन्हा एकदा पाहा. भारताच्या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीरचा भाग भारताच्या नकाशात दिसत असला तरी डावीकडे पाकिस्ताननं भारताच्या भूभागावर कब्जा केलाय उजवीकडे चीननं. आता सुरू असलेला वाद हा गलवान खोऱ्यावरून आहे.

सगळ्यात आधी येऊयात नकाशातल्या लाल रेषेवर...इथंच 1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं. युद्धानंतर हा भाग बनला एलएसी...ही रेखा भारत आणि चीनला वेगवेगळी करते. 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये समझौता करार झाला. तांत्रिक दृष्ट्या भारत निळ्या रेषेपर्यंत प्रदेश आपला भूभाग मानतो. तर राखाडी रंगातील ही
रेखा एक्सप्रेस-वे म्हणून ओळखली जाते. चीननं स्वार्थी हेतून आखलेल्या या रेषेला भारत नेहमीच विरोध करत आलाय. 

एलएसीबद्दल माहिती घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे नकाशात दिसणाऱ्या या रेखा प्रत्यक्षात जमिनीवर आखण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच सीमावादाचा प्रश्न वर्षानुवर्ष चालत राहिलाय.  

आता समजून घेऊयात गलवान खोऱ्याबद्दल 

या भागाचं नाव गुलाम रसूल गलवान या व्यक्तीच्या नावावरून पडलं. काही लोकांच्या मते गलवान हा दरोडेखोर होता तर काही लोकं गलवान मेंढपाळ असल्याचं म्हणतात. 1899 साली भारतातल्या विविध भूभागांपर्यंत जाऊन तिथल्या परिसराची माहिती काढण्यासाठी ब्रिटिशांनी स्थानिकांचे काही गट स्थापन केले होते. त्यात लडाखच्या भागात जाण्यासाठीच्या गटाचं नेतृत्व गुलाम रसूल गलवान याच्याकडे होतं. लडाखच्या डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशात फिरताना पहिल्यांदा या दरीचा आणि तिच्या बाजूनं वाहणाऱ्या नदीचा शोध गुलाम रसूलच्या गटानं लावला. त्यामुळे या भागाला गलवान हे नाव देण्यात आलं. 

याचाच अर्थ गलवान खोऱ्यावर पूर्णपणे भारताचा अधिकार आहे. असं असतानाही चीन गलवान खोऱ्यात आगळीक करतोय. कारण या भूभागावर वर्चस्व मिळवलं तर भारताला मोठी मात बसेल अशी भाबडी आशा चीन बाळगून हे. पण 
भारत चीनचे कपटी मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे चीनने गलवान खोऱ्यात आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live