केंद्राने व्हॉट्सऍपला ठणकावलं..

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

इन्स्टंट मेसेजिंगमधील लोकप्रिय ऍप असलेल्या व्हॉट्सऍपला केंद्र सरकारने इशारा दिला आहे. मागच्या काही दिवसात व्हॉट्सऍपवर फिरणाऱ्या चिथावणीखोर संदेशांमुळे संतप्त जमावाकडून ठेचून हत्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. केंद्र सरकारने या घटनांची गंभीर दखल घेतली असून व्हॉट्सऍपला असे बेजबाबदार, चिथावणीखोर मेसेजेस रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली नाराजी व्हॉट्सऍपच्या कानावर घातली असून व्हॉट्सऍपला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live