महाराजांचा पुतळा हटवल्यानं वातावरण तापलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह बेळगावमध्येही तीव्र आंदोलन

साम टीव्ही
रविवार, 9 ऑगस्ट 2020

 

  • कन्नडिगांचा माज उतरवा; अवघा महाराष्ट्र आक्रमक
  • महाराजांचा पुतळा हटवल्यानं वातावरण तापलं
  • महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह बेळगावमध्येही तीव्र आंदोलन

कन्नडिगांनी महाराष्ट्राची पुन्हा एकदा कुरापत काढलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची बदमाशी कर्नाटक सरकारनं केलीय. त्यावरून आता वातावरण पेटू लागलंय.

कन्नडिगांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला, मराठी स्वाभिमानाला डिवचलंय. निपाणीजवळच्या मनगुत्ती गावातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कन्नडिगांनी रात्रीच्या अंधारात हटवला. अवघ्या महाराष्ट्रासह बेळगावमध्येही याचे तीव्र पडसाद उमटायला लागलेत. कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचा पुतळाही जाळण्यात आलाय. 

मराठी अस्मितेला डिवचण्यासाठीच कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारनं हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया उमटतेय.

निपाणीजवळच्या मनगुत्ती गावात रात्रीच्या अंधारात महाराजांचा पुतळा हटवण्याचं कृष्णकृत्य कन्नडिगांनी केलं. खरं तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानलं जातं. त्यामुळेच मराठी अस्मितेला डिवचण्यासाठी कन्नडिगांनी कुरापत काढलीय. अर्थात महाराजांचा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही. महाराजांचा पुतळा पुन्हा बसेपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, हे निश्चित.


संबंधित बातम्या

Saam TV Live