प्रॉव्हीडंट फंडावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता; आठ कोटी नोकरदारांना बसणार फटका?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

प्रत्येक नोकरदारासाठी जर काही महत्वाचं असेल, तर ती असते त्याच्या  प्रॉव्हीडंट फंडाची रक्कम. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्याने केलेली ती एक प्रकारची बेगमीच असते. मात्र भविष्यात या रकमेवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने नोकरदारांना मोठा फटका बसणार आहे. सध्या प्रॉव्हीडंट फंडावर वर्षाकाठी 8.65 टक्के इतकं व्याज मिळतं. मात्र केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेवरील व्याज दर कमी करण्याची शिफारस ईपीएफओला केलीय. 

प्रॉव्हीडंट फंडावर अधिक व्याज दिल्यास बँकांवरील ठेवींवर अधिक व्याज देणं शक्य होणार नाही, असा अर्थमंत्रालयाचा दावा आहे. शिवाय ईपीएफओने आपल्याकडील 11 लाख कोटीच्या निधींपैकी मोठी रक्कम IL&FS या नॉन बँकींग कंपनीत गुंतवलीय. IL&FS ही कंपनी सध्या आर्थिक अडचणीत असून या कंपनीद्वारे दिलेली तब्बल 90 हजार कोटींची कर्ज बुडीत खात्यात गेलीत. त्यामुळे ईपीएफओद्वारे या कंपनीत गुंतवण्यात आलेली रक्कमही अडचणीत सापडलीय. अशा परिस्थितीत प्रॉव्हीडंट फंडावर अधिक व्याज दिल्यास आर्थिक अडचणी वाढतील असा अर्थमंत्रालयाचा दावा आहे.

ईपीएफओ ही संस्था केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मंजुरीनंतर कामगार मंत्रालयाकडे व्याज दर कपातीचा हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

WebTitle : marathi news interest rates on PF might be reduced 

संबंधित बातम्या

Saam TV Live