महाराष्ट्राच्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मराठी विरूद्ध परप्रांतीय संघर्ष पेटला

महाराष्ट्राच्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मराठी विरूद्ध परप्रांतीय संघर्ष पेटला

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस खात्याला सध्या वादाचं ग्रहण लागलंय. राज्याच्या पोलिस खात्यात मराठी विरूद्ध परप्रांतीय असा संघर्ष पेटून उठलाय. मोठ्या प्रकरणांच्या चौकशीवर या वादाचे थेट पडसाद उमटू लागलेत. पोलिसांबद्दल जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून सरकारी स्तरावर कडक पावलं उचलली जाणार असल्याची माहिती साम टीव्हीच्या हाती लागलीय.  

26/11च्या हल्ल्यावेळीही मराठी आणि अमराठी असा वाद पुढे आला होता. कसाब आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात मरण पावलेले सर्व पोलिस अधिकारी मराठी होते. सध्या सुरू असलेला हा वाद हा त्याचा पुढचाच अंक असल्याचं बोललं जातंय. पोलिस दलातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे आपल्याबाबतीत कायम दुजाभाव केला जातो ही भावना मराठी पोलिस अधिकाऱ्यांमध्ये आहे. बदल्यांपासून बढत्यांपर्यंत मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना डावललं जात असल्याची भावना आहे. इतकच नाही तर मराठी अधिकारी जास्तवेळ एखाद्या पदावर राहू नये म्हणून अमराठी अधिकारी राजकारण करत असल्याचा आरोपही होतोय. त्यामुळे पोलिस दलाला लागलेलं अंतर्गत संघर्षाचं ग्रहण सोडवण्यासाठी सरकार काय भूमिका घेतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

खाकीतला अंतर्गत वाद तसा राज्याच्या गृहखात्यासाठी नवीन नाही. पण आता जो वाद निर्माण झालाय तो अतिशय टोकाचा असून त्याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. मराठी विरूद्ध अमराठी संघर्षाचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू शकतात त्यामुळे हा वाद मिटवणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे. 

Webtitle : marathi news internal conflicts in maharashtra police 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com