लक्ष्मण माने vs प्रकाश आंबेडकर ; वंचित विकास आघाडीत उभी फूट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

वंचितचे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपला पूरक भूमिका घेत असल्याचे माने यांनी म्हटले आहे. माने हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. त्याचा आज स्फोट झाला. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये उभी फूट पडल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडी स्थापनेवेळी लक्ष्मण माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, आता त्यांनीच बंड पुकारले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपमधून आलेल्या गोपीचंद पडळकरांना प्रकाश आंबेडकरांनी महासचिव बनवले. तसेच प्रवक्तेपदेही नेमले आले. अजून एक मुस्लिम नेते आहेत. ते भाजपमधून आले असून त्यांना सचिव बनवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे शिवसेना- भाजपच्या 10-12 जागा निवडून आल्या आहेत. तो निर्णय चुकीचा होता. तसेच, आंबेडकरांची कार्यशैली न रूचणारी आहे. 

वंचित विकास आघाडीत उभी फूट पडली असून माजी आमदार लक्ष्मण माने यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधत त्यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनाही माने यांनी टोमणा मारला. पडळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या असल्याची टीका माने यांनी केली.

WebTitle : marathi news internal conflicts in vanchit bahujan aghadi laxman mane targets prakash ambedkar on his ideology

संबंधित बातम्या

Saam TV Live