'इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स' : #AliaBhatt चं निर्मिती क्षेत्रात पाऊल 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मार्च 2019

मुंबई : सध्या व्हर्सटाईल अभिनेत्री म्हणून आलिया भटकडे बघितले जाते. नुकताच तिचा आणि रणविर सिंगचा 'गली बॉय' हिट ठरला. आता आलिया निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आलियाने स्वत:ची 'इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स' नावाची निर्मिती संस्था सुरु केली आहेय 

तिने आपल्या ऑफिससाठी जागादेखील विकत घेतली आहे. ''मला आवडणारी प्रत्येक गोष्ट माझ्या ऑफिससाठी मी तयार करून घेतली आहे. मला जे चित्रपट प्रेक्षक म्हणून पाहायला आवडतील केवळ अशा चित्रपटांची निर्मिती मी करण्याचे ठरवले आहे.' असे आलियाने सांगितले.

सध्या आलिया तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' आणि 'कलंक' चित्रपटांच्या चित्रिकरणातही व्यग्र आहे. 

Web Title: Alia Bhatt turns producer & names her production house 'Eternal Sunshine'

संबंधित बातम्या

Saam TV Live