कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जुलै 2019

हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे.

हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज (बुधवार) निकाल दिला. यामध्ये 15 विरुद्ध 1 असा निकाल भारताच्या बाजूने लागल्याची माहिती मिळत आहे. न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ यांनी याबाबतचा निकाल दिला. या निकालामुळे भारताचा विजय झाला आहे.

पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल अन्वर मन्सूर खान हे पाकच्या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांचाही या पथकात समावेश आहे. कुलभूषण (वय 48) यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचे आरोप ठेवले असून, या प्रकरणी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना 11 एप्रिल 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठविली आहे. कुलभूषण यांची मुक्तता करण्याची मागणी भारताकडून करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानकडून त्यास विरोध करण्यात येत आहे.

भारतीय नौदल माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने दहशतवादी कारवायांचा ठपका ठेवत त्यांना शिक्षा ठोठावली होती. भारताने 2017 मध्ये याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. येथे न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल देत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली होती

आणेवाडीतल्या गावकऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष 

दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं देशभरातून आनंद व्यक्त केला जातोय. सांगलीतील आणेवाडी हे जाधव यांचं गाव. आंतरराष्ट्रीय कोर्टानं दिलेल्या निर्णयानतर आणेवाडीतल्या गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. तर मुंबईतल्या जाधव यांच्या मित्रांनीही मिठाई वाटत आणि फुगे सोडत आनंद साजरा केला.

Webtitle : marathi news The International Court of Justice ruled in favour of India by 15 votes to 1


संबंधित बातम्या

Saam TV Live