योग दिनानिमित्त योगगुरू रामदेव बाबा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

योग दिनानिमित्त योगगुरू रामदेव बाबा यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. रामदेव बाबांसह तब्बल अडीच लाख नागरिकांनी योगासनं केलीत. यावेळी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमसुद्धा उपस्थित होती. बाबा रामदेव यांच्यासह राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनीसुद्धा योगासनं केली. रामदेव यांच्या योगासन कार्यक्रमाला विद्यार्थी, सेना, पोलिसांसह आसपासच्या गावातील नागरिकांनीही हजेरी लावलीये.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये योग दिनासाठी उपस्थित होते. डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेत योगदिनानिमित्त देशातील मोठा कार्यक्रम पार पडत असून यात 55 हजार जण सहभागी झाले आहेत. तसंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि राज्यपाल कृष्णकांत पाल यांनीही योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live