चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योगाभ्यास

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 जून 2018

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात योग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये योग दिनासाठी उपस्थित होते. डेहराडूनच्या वन संशोधन संस्थेत योगदिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम पार पडला. यात 55 हजार जण सहभागी झाले आहेत. तसंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि राज्यपाल कृष्णकांत पाल यांनीही योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. 

याखेरीज भारतीय दूतावासांच्या समन्वयातून 150 देशांमध्येही हा कार्यक्रम साजरा केला जातोय. तसंच द्वारकामध्ये पतंजली योग समिती तसंच दिल्लीत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे योगदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live