INTRESTING VIDEO | घरोघरी लॉकडाऊनच्या चुली

साम टीव्ही
रविवार, 19 एप्रिल 2020
  • मंडळी आम्ही  जो पिक्चर तुम्हाला दाखवणार आहोत, त्याचं नाव आहे 
  • घरोघरी लॉकडाऊनच्या चुली
  • या पिक्चरचे सर्वेसर्वा आहेत, विश्वाचे कर्दनकाळ कोरोना व्हायरस
  • बाकी कुणाला याचं श्रेय देण्याचं मूळीच कारण नाही

मंडळी आम्ही  जो पिक्चर तुम्हाला दाखवणार आहोत, त्याचं नाव आहे, घरोघरी लॉकडाऊनच्या चुली. या पिक्चरचे सर्वेसर्वा आहेत, विश्वाचे कर्दनकाळ कोरोना व्हायरस. बाकी कुणाला याचं श्रेय देण्याचं मूळीच कारण नाही.
इकडे आड अन् तिकडे विहीर ही म्हण आता इकडे बायको अन् तिकडे पोलिस अशी बदलून घ्यायला अजिबात हरकत नाहीये. 
कारण घरात राहिलो म्हणून बायकोची बोलणी खा.. आणि बाहेर पडलो तर पोलिसांचे दंडुके.... कोरोनाचं पोरं अन् जिवाला घोर म्हणतात ते 
उगीच नाही..
आता म्हणी बदलतायत. पण परिस्थिती काही बदलत नाहीये. 

कांदे... कांदे आणि सगळ्याचेच वांदे. पण करणार काय. वर्क फ्रॉम होम करत बसलेल्या या सरड्याची डाव किराणापर्यंतच राहिलेय... 
आता कॅलेंडरवर पुल्या मारत लॉकडाऊनची वाट बघण्याखेरीस गत्यंतर नाही... या सगळ्यात व्हॉटसअॅपवर येणारे व्हिडिओज तेवढे दिलासा देतात... 

बायकोने नवऱ्याला घरात बांधून ठेवलं... भांडी घासायला लावली...

विधाता कठोर झालेला असतनाच, आपली बायको अजून तरी इतकी कठोर झालेली नाही.. हाच काय तो दिलासा. या लुटुपुटच्या 
भांडणांवर उपाय नाहीये. तेव्हा सकाळ संध्याकाळ दोन टाईम-कोरोनाच्या नावाचे बोटं मोडा. तेवढाच काय तो बोटांचा व्यायाम. 


संबंधित बातम्या

Saam TV Live