"सलमान, शाहरूख, आमिरच्या संपत्तीची चौकशी करा, विदेशात एव्हढी मालमत्ता आली कुठून? "

साम टीव्ही
शनिवार, 11 जुलै 2020
 •  
 • सलमान, शाहरूख, आमिरच्या संपत्तीची चौकशी करा
 • विदेशात एव्हढी मालमत्ता आली कुठून? 
 • भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केली चौकशीची मागणी

बॉलिवूडचे तीन खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. सलमान, शाहरूख आणि आमिर या तीन खान अभिनेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय. 

सलमान, शाहरूख आणि आमिर...गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या खान ब्रदर्सचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच कोणत्या कोणत्यानं कारणानं चर्चेत असलेले हे कलाकार यावेळी मात्र भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींच्या एका ट्विटनं अडचणीत येण्याची शक्यता आहे. या खान मंडळींनी परदेशात प्रचंड संपत्ती जमवली असून एव्हढी संपत्ती आली कुठून असा सवाल सुब्रमण्यम स्वामींनी केलाय. परदेशात विशेष: दुबईत त्यांच्या नावे बंगले आणि इतर संप्तती आहे. त्यांच्या संपतीची ईडी, आयकर विभाग आणि सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सुब्रमण्यम स्वामींनी केलीय. 
 
शाहरूखची संपत्ती

 • मुंबईत मन्नत बंगला असून त्याची अंदाजे किंमत 200 कोटी रूपये इतकी आहे. 
 • अलिबागमध्ये फॉर्महाउस
 • किंमत - 250 कोटी
 • लंदनमध्ये बंगला
 • किंमत-190 कोटी
 • दुबईत सिग्नेचर विला
 • किंमत -20 कोटी
 • लिमोजिनपासून रोल्स रॉयल्स पर्यंत आलिशान गाड्या
   

सलमान खान

 • चंडीगढ़, नोएडा, मुंबई आणि दिल्लीत आलिशान घरं आणि इतर मालमत्ता 
 • मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत 114 कोटी
 • रोल्स रॉयल, मर्सिडीज, ऑडी सारख्या महागड्या गाड्या
 • दुबईत कोट्यवधींचं घर असल्याची चर्चा 

आमिर खान

 • मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या नावे मुंबईत आलिशान घर असून त्याची किंमत 50 कोटी रूपये आहे. 
 • मुंबई आणि बंगळुरूत त्यानं 1300 कोटींची गुंतवणूक केल्याचं बोललं जातंय. 
 • मर्सिडीस बेंज, बेंटले कॉन्टिनेंटल आणि BMW अशा 22 कोटींच्या गाड्या त्याच्या मालकीच्या आहेत. 
 • शाहरूख, सलमान आणि आमिर एकेका सिनेमासाठी कोट्यवधी रूपयांचं मानधन घेतात. याशिवाय जाहिरात आणि गुंतवणूकीतून येणारं उप्तन्नही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींच्या मागणीनुसार या कलाकारांच्या संपत्तीची चौकशीस झाली तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. 


संबंधित बातम्या

Saam TV Live