मार्क झुकरबर्गने राजीनामा द्यावा; फेसबुकच्या गुंतवणूकदारांचा झुकरबर्गवर दबाव

मार्क झुकरबर्गने राजीनामा द्यावा; फेसबुकच्या गुंतवणूकदारांचा झुकरबर्गवर दबाव

सॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, असे फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकरबर्गवर दबाव आणला आहे. फेसबुककडून वैयक्तिक माहिती (डेटा लिक) उघड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र आता झुकरबर्गने राजीनामा देणार नसल्याचे आणि निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 मंगळवारी अमेरिकी माध्यमांशी बोलताना मार्क झुकरबर्ग म्हणाला की, 'जुलैपासून फेसबुकच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर सुमारे ४० टक्के घसरला आहे. असे असताना फेसबुक सोडण्याची ही योग्य वेळ नाही. कंपनीत मी कायमच राहणार नाही, मात्र सध्याच्या परिस्थितीत फेसबुक सोडून देण्यात काहीच अर्थ नाही. कंपनी मी चालवतो त्यामुळे इथे जे काही घडते, त्यासाठी सर्वस्वी मी जबाबदार आहे.' फेसबुकने विरोध करणाऱ्यांविरोधात डिफायनर्स या पीआर कंपनीची सेवा घेऊन मोहीम सुरु केली होती, असे बोलले जात होते. मात्र फेसबुकने हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

WebTitle : marathi news investors demands resignation of facebook owner mark zukerburg 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com