INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणात मी आरोपी नाही : पी. चिदंबरम

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माझा किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणाचाही यामध्ये समावेश नाही. मी आणि माझे पुत्र कार्ती चिदंबरम यांना जाणूनबुजून यामध्ये गोवण्यात येत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकरणात मी आरोपी नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत चिदंबरम बोलत होते. ते म्हणाले, मला न्यायालयाकडून अंतरिम जामीन 31 मेला मिळाला होता. 7 महिन्यानंतर माझा अंतरिम जामीन नाकारण्यात आला. माझ्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काल रात्री मी माझ्या वकिलांसोबत चर्चा केली. त्याबाबतची कागदपत्रे जमा केली.

तसेच ते पुढे म्हणाले, मी कायद्याचा सन्मान करतो. तपास संस्थांनीही कायद्याचा आदर केला पाहिजे. त्यानुसार वागले पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो. शुक्रवारपर्यंत वाट पाहू. नक्कीच काहीतरी चांगले घडले.

संबंधित बातम्या

Saam TV Live