बेन स्टोक्स यंदाचा सगळ्यात महागडा प्लेयर; राजस्थान रॉयल्सने 12.50 कोटी रुपयांना घेतलं विकत

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जानेवारी 2018

कोणाकडे किती पैसे शिल्लक 

चेन्नई - 47 कोटी 
दिल्ली - 47 कोटी 
पंजाब - 67.5 कोटी 
मुंबई - 47 कोटी 
राजस्थान - 67.5 कोटी 
बंगळूर - 49 कोटी 
हैदराबाद - 59 कोटी

बंगळूर : कायदेशीर कारवाई झालेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला याला तब्बल 12.50 कोटी रुपयांना यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या राजस्थान रॉयल्स खरेदी केले. तर, प्रमुख भारतीय खेळाडूंचाही आयपीएल लिलावात बोलबाला असल्याचे पहायला मिळाले. आश्चर्य म्हणजे, विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

शिखर धवन, किरॉन पोलार्ड या खेळाडूंना आपापल्या संघांनी राईट टू मॅच अंतर्गत आपल्या संघात कायम ठेवले. मात्र, त्यांना अधिक किंमत मिळाली. तर, अजिंक्य रहाणेला 4 कोटी रुपये देत राजस्थानने आपल्या संघात कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याला 9.40 कोटी रुपये देत कोलकता नाईट रायडर्सने खरेदी केली. फिरकीपटू आर. आश्विनलाही 7.40 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने खरेदी केले.

भारतीय क्रिकेट संघाची दक्षिण आफ्रिकेत अवस्था कशीही होत असली, तरी भारतात आयपीएल लिलावात जगभरातील खेळाडूंवर बोली लागताना दिसत आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍सला आतापर्यंत सर्वाधिक भाव मिळाला असून, न्यूझीलंडचा आक्रमक सलामीवीर कॉलिन मुन्रो यांना अधिक भाव मिळण्याची शक्‍यता आहे. त्याच वेळी भारताचे माजी सुपरस्टार युवराज सिंग, गौतम गंभीर यांचे काय होणार, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. 

काही प्रमुख खेळाडूंच्या रिटेशननंतर सर्व फ्रॅंचाईस संघ बांधण्यासाठी कोणकोणते खेळाडू आपल्या संघात हवेत, याची तयारी करत होते. शनिवारी मैदानाबाहेरची रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. इतिहासापेक्षा विद्यमान कामगिरीनुसारच खेळाडूंना पसंती दिली जाईल; त्यामुळे युवराज, गंभीर, हरभजन सिंग यांच्यासारख्या काही माजी भारतीय खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.  राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे माजी विजेते दोन वर्षांनंतर पुन्हा मैदानात उतरणार असल्यामुळे त्यांची नव्याने संघ तयार करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

कोणाला मिळू शकेल अधिक भाव? 

बेन स्टोक्‍स, कॉलिन मुन्रो, एविन लुईस (वेस्ट इंडीज), अँण्ड्य्रू टे (ऑस्ट्रेलिया), रशिद खान (अफगाणिस्थान), जेसन रॉय (इंग्लंड), इश सोधी (न्यूझीलंड), क्विंन्टन डिकॉक (दक्षिण आफ्रिका, उपलब्धता तपासली जाईल) 

'अनकॅप्ड' भारतीयांमध्येही स्पर्धा 

'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले) खेळाडूंमध्ये भारताच्या नवोदित खेळाडूंना घेण्यासाठी मोठी स्पर्धा असेल. त्यामध्ये मुंबईचा पृथ्वी शॉ, 16 वर्षांखालील विजय मर्चंट स्पर्धेत द्विशतक करणारा पंजाबचा शुभम गिल, 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये ताशी 150 कि.मी. वेगाने गोलंदाजी करणारा कमलेश नागरकोटी, विदर्भाच्या रणजी विजेतेपदामध्ये निर्णायक कामगिरी करणारा रजनीश गुरबानी यांना चांगला भाव मिळू शकेल. या नवोदितांची पायाभूत रक्कम 20 लाखांपासून सुरू होणार आहे. 

लिलाव झालेले खेळाडू 

बेन स्टोक्स - 12.50 कोटी (राजस्थान रॉयल्स)
मिशेल स्टार्क - 9.40 कोटी (कोलकता नाईट रायडर्स)
ग्लेन मॅक्सवेल - 9 कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
आर. आश्विन - 7.60 कोटी (किंग्ज इलेव्हन पंजाब)
किरॉन पोलार्ड -  5.40 कोटी (मुंबई इंडियन्स)
शिखर धवन - 5.20 कोटी (सन रायझर्स हैदराबाद)
अजिंक्य रहाणे - 4 कोटी (राजस्थान रॉयल्स) 
फाफ डू प्लेसिस - 1.60 कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
हरभजनसिंग - 2 कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
शाकीब अल हसन - 2 कोटी (सन रायझर्स हैदराबाद)

उपलब्ध खेळाडूंची आकडेवारी 
लिलावासाठी उपलब्ध खेळाडू 1122 
आंतरराष्ट्रीय खेळाडू 281 
आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेले खेळाडू 838 
सहयोगी देशांतील खेळाडू 3 
एकूण भारतीय खेळाडू 778 

कोणाकडे किती पैसे शिल्लक 
चेन्नई - 47 कोटी 
दिल्ली - 47 कोटी 
पंजाब - 67.5 कोटी 
मुंबई - 47 कोटी 
राजस्थान - 67.5 कोटी 
बंगळूर - 49 कोटी 
हैदराबाद - 59 कोटी

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live