IPL च्या अकराव्या मोसमाला आजपासून सुरुवात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 एप्रिल 2018

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला आजपासून  सुरुवात होतेय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. बंदीमुळे चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा संघ पुन्हा मैदानात उतरला आहे. त्यामुळे धोनीला पुन्हा चेन्नईकडून खेळताना पाहण्यास चाहते उत्सुक असतील. दोन्ही संघांत तुल्यबळ खेळाडू असल्याने एका रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live