महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. 

बिद्रे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले वुडकटर हे कोल्हापूरमधून पुरवण्यात आले होते, असे निनावी पत्र अश्विनी बिद्रे यांच्या वडिलांना मिळालं आहे.

या पत्राच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील तरुणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बिद्रे यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत टाकल्याची कबुली आरोपी महेश पळणीकर याने दिली होती. बिद्रे हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर प्रमुख आरोपी असून, या प्रकरणात एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live