बगदादीचा खात्मा; ट्रम्प यांनी केलं ट्विट

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केलेल्या ट्विटचा अखेर उलगडा झाला असून, अमेरिकेला इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल् बगदादीचा खात्मा करण्यात यश आले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी केलेल्या ट्विटचा अखेर उलगडा झाला असून, अमेरिकेला इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल् बगदादीचा खात्मा करण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने सीरियात केलेल्या लष्करी कारवाईत बगदादी ठार झाल्याचे स्पष्ट आहे. पण, त्याची डीएनए चाचणी सुरु असून, त्यानंतर अधिकृतरित्या याची माहिती जगासमोर आणण्यात येईल. ट्रम्प यांनी ट्विट करत काहीतरी मोठे घडल्याचे म्हटले होते. त्यानंतर याबाबत तर्कवितर्क लढविण्यास सुरवात झाली. अखेर याबाबत स्पष्ट झाले असून, बगदादीला ठार करण्यात अमेरिकेला यश आले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजता ट्रम्प याची अधिकृत घोषणा करतील. 

पेंटागॉनने याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यास आता नकार दिला आहे. गेल्या पाचवर्षांपासून सीरियात कार्यरत असलेल्या इसिस या क्रुर दहशतवादी संघटनेचा बगदादी म्होरक्या होत्या. जुलै 2014 मध्ये बगदादीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. मोसुल शहरातील प्रसिद्ध मशिदीतून बोलतानाचा त्याचा हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. अमेरिकेने अनेकवेळा एअर स्ट्राईक करून इसिसची ठिकाणी नष्ट केली. मे 2017 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात बगदादी जखमी झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता त्याला ठार करण्यात आल्याचे वृत्त येत आहे.

Web Title: ISIS Chief Baghdadi Killed in US Military Raid in Syria Detonated Suicide Vest


संबंधित बातम्या

Saam TV Live