पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना मुक्तपणे काम करतात - बिलावल भुट्टो

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना मुक्तपणे काम करतात - बिलावल भुट्टो

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील जैशेचा म्होरक्या मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. यामुळे एका अर्थी चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, आता पाकिस्तान सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी संसदेचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर सरकारचा वचक नसून ते मुक्तपणे काम करत असल्यचा आरोप केला आहे. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मोकाट कसे फिरतात असा सवाल बिलावल यांनी इम्रान खान सरकारला केला आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या सरकारला बिलावल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले. पाकिस्तानमधील सक्रिय दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जात नाही. माझ्या आईचीही हत्या याच कारणामुळे झाली. हे दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये लहान मुलांचे प्राण घेत आहेत. परदेशांमध्ये दहशतवादी कारवाया करत आहेत. आज संपूर्ण पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागत असल्याचे बिलावल म्हणाले आहेत. तसेच इम्रान खान यांच्या सरकारमध्ये नेतेपदावर असणाऱ्या तीन जणांचे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध असल्याचा गौप्यस्फोटही बिलावल यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी शेजारच्या देशांमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या संघटनांना पाकिस्तानमध्ये कोणतही स्थान नसल्याचे म्हटले होते. सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन इम्रान यांनी दिले होते. 

Web Title: Bilawal Bhutto blasts Pakistan govt Why are terrorists who attack other nations free

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com