सैनिकांनो देशाचे रक्षण करा, देशापुढे मोठ-मोठी आव्हाने उभी आहेत- पाकिस्तान हवाई दल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 मार्च 2019

इस्लामाबादः सैनिकांनो, देशापुढील आव्हाने अजून संपलेले नाही. देशाचे तुम्ही संरक्षण करा, असे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

इस्लामाबादः सैनिकांनो, देशापुढील आव्हाने अजून संपलेले नाही. देशाचे तुम्ही संरक्षण करा, असे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

मुजाहिद अन्वर खान यांनी आज हवाई दलाचे वैमानिक, अभियंता व सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, 'भारतीय हवाई दलाने गेल्या आठवड्यात पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना त्यांची दोन विमाने पाडली. पाकिस्तानने सुद्धा भारतात विमाने घुसवली, याबद्दल पाकिस्तानी वैमानिकांचा अभिमान वाटतो. पण, देशापुढील आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. त्यामुळे सैनिकांनो तुम्ही देशाचे रक्षण करा.'

'पाकिस्तानी हवाई दलाने उत्तुंग कामगिरी करताना भारताचे विमान पाडल्याबरोबरच त्यांचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पकडले. देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांतीदूत म्हणून अभिनंदन यांची सुटका केली. पण, देशापुढे मोठ-मोठी आव्हाने उभी आहेत. यामुळे तु्म्ही सदैव तयार रहा आणि देशाचे संरक्षण करा,' असे आवाहन मुजाहिद अन्वर खान यांनी केले.

Web Title: Challenges not over yet keep your guard up says pak Air chief tells PAF personnel


संबंधित बातम्या

Saam TV Live