पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बोलावली तातडीची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

इस्लामाबादः भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'बालाकोट परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.'

'पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहमूद कुरेशी यांनी परराष्ट्रमंत्रालयातील अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर बैठकीत चर्चा होणार आहे,' असे कुरेशी यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान हुतात्मा झाले. जगभरातून पाकिस्तानवर दबाव आल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Pakistan PM Imran Khan summons important meeting in wake of Indias LoC violation

संबंधित बातम्या

Saam TV Live